NITI आयोगाने ‘आकांक्षी’ जिल्ह्यांसाठी क्रमवारीता जाहीर; विरुधुनगर प्रथम क्रमांकावर

NITI आयोगाने ‘आकांक्षी’ जिल्ह्यांसाठी क्रमवारीता जाहीर; विरुधुनगर प्रथम क्रमांकावर

NITI आयोगाने ‘आकांक्षी’ जिल्ह्यांसाठी क्रमवारीता जाहीर; विरुधुनगर प्रथम क्रमांकावर

NITI Aayog 
आरोग्य व पोषण, कृषी व जलसंपदा, आर्थिक समावेशन, शिक्षण, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या सहा विकासात्मक क्षेत्रात 1 जून 2018 ते 31 ऑक्टोबर 2018 या काळात केलेल्या प्रगतीच्या आधारे NITI आयोगाकडून ‘आकांक्षी’ जिल्ह्यांसाठी द्वितीय क्रमवारीता (डेल्टा रँकिंग) जाहीर करण्यात आली आहे.
ठळक बाबी
एकूणच, सर्वात सुधारित जिल्हा म्हणून तामिळनाडूच्या विरुधुनगर याला पहिला क्रमांक मिळालेला आहे.
सर्वात सुधारित जिल्ह्यांमध्ये विरुधुनगरच्या पाठोपाठ न्युपाडा (ओडिशा), सिद्धार्थनगर (उत्तरप्रदेश), औरंगाबाद (बिहार), कोरापुट (ओडिशा) यांचा क्रम लागतो आहे.

कमीतकमी प्रगती केलेल्या जिल्ह्यांमध्ये तळाशी किफिरे (नागालँड) 107 व्या क्रमांकावर आहे. त्याखाली गिरीडीह (झारखंड), चत्रा (झारखंड), हैलाकांडी (आसाम) आणि शेवटी पाकुर (झारखंड) यांचा क्रम लागतो आहे.
आकांक्षी जिल्हे कार्यक्रम
दि. 5 जानेवारी 2018 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते आकांक्षी जिल्हे कार्यक्रमाची (Aspirational Districts Program) सुरुवात झाली.  हा भारत सरकारचा एक प्रयोग आहे.
जिल्ह्यांचा विकास आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व जलसंपदा, वित्‍तीय समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा अश्या मानदंडांच्या आधारावर केला जात आहे. एकूण 117 जिल्ह्यांची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे
NITI आयोगाने ‘आकांक्षी’ जिल्ह्यांसाठी क्रमवारीता जाहीर; विरुधुनगर प्रथम क्रमांकावर NITI आयोगाने ‘आकांक्षी’ जिल्ह्यांसाठी क्रमवारीता जाहीर; विरुधुनगर प्रथम क्रमांकावर Reviewed by VRG Trick on January 30, 2020 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.